वार्यावर लहरते मी...
अंबर कवेत घेते मी...स्वप्नांना त्या
मोरपिसापरि जपते मी..
झुळझुळणार्या नदी-खळ्यातुन
ओघळणार्या दव-थेंबातुन
डुलणार्या रानफ़ुलातुन
चमचमणार्या चांदतार्यातुन
पावसाच्या प्रत्येक सरीतुन
गोंडस फ़ुलाच्या गंधातुन
कणाकणातुन-मनामनातुन
तुझी स्वप्न जपते रे...
तुझ्या स्वप्नांशि बोलते रे..
तुझी स्वप्न जागते रे....
तुझी स्वप्न जगते रे....
...सई(सुप्रिया पाटील)
No comments:
Post a Comment