Sunday, June 7, 2009

"फ़िलहाल जी लेने दे"

हातातुन निसटावी वाळू,
तसे हे कडु-गोड क्षण निसटतायतं...
कुठले जपुन ठेवायचे,
अन कुठले खोडायचे,
याचे हिशोब मांडायलाही,
क्षण अपुरे पडतायत....
धावपळीच्या या आयुष्यात,
काय जगायच...कस्स जगायचं....
हेही वेळ बघुन आपण ठरवतोयं....
व्यवहारी या जगण्यात,
येणारा प्रत्येक क्षण निघुन जातोय....
आपण मात्र तस्सच "मोनोटोनस" जीवन जगतोय.....
उद्या जुनं आठवायला काहीच उरणार नाही....
कुणी विचारलं "काय जगलातं???"...
तर काय उत्तर असणार आहे आपल्याकडे.....
होईल ते होईल पुढे त्यासाठी आज का मरत जगा.....
मी तर आता येणारा प्रत्येक क्षण
मनभरुन आपलासा करुन जगावं म्हणतेय.....
कुणी अडवलं अस जगताना तर आशाताई सारखं म्हणेन....
"ये लम्हा फ़िलहाल जी लेने दे"

....सई

3 comments:

भानस said...

सही!!!
" ये लम्हा फिलहाल जी लेने दे " मीही सामील बरंका ह्यात.

संदीप सुरळे said...

Lovely....u r beauty yaar...n same ur words...
I am impressed...

अनिल कडभाने said...

सर्व काही सुंदर लिहले आहे !तुम्हाला अजुन लिहन्यासाठी मनापासुन शुभेच्छा