सखे,
फ़ार पुर्वी कुठतरी वाचलं होत,की प्रेमात पडल्यावर मुलाच जग काहीच बदलत नाही,पण मुलीच सगळं जग त्या एका व्यक्तीबोवतीच गुरफ़टुन राहतं.....आज प्रकर्षानं हे खरच आहे अस जाणवलं......खरच किती बदलतो आपण प्रेमात पडल्यावर,आपला जोडीदार कितीही समजून घेणारा असला किंवा किती स्पेस देणारा असला तरीही....तरीही....बदल हे होतातच......
आज एक मुलगी म्हणुन हे सगळं जाणवतयं....मला त्याच्याशिवाय अस काही विश्वच उरलेलं नाही.....सगळ जग त्याच्याच अवतीभवती सामावलेलं आहे.....प्रत्येक छोटी-छोटी गोष्ट करताना....काही करण्याच्या विचारही करताना पहीला विचार त्याचा येतो...त्याला काय वाटेल...नाहीतर तो काय म्हणेल.
तो मला खुप समजुन घेतो....मी त्याच्याशी सगळं शेअरही करते...पण कधी काही गोष्टी एखाद्या जवळच्या मित्राला वा मैत्रीणीला सांगाव्याशा वाटल्या तर मला तस कुणी उरलच नाहीये हे कळुन चुकतं....
प्रेमात पडल्यामूळे इतर नात्यांवर परिणाम का व्हावा हेच कळत नाही....पुर्वीसारखं मित्र-मैत्रीणींशी भेटणं होत नाही...त्यांच्याशी फ़ोनवर बोलणही होत नाही...इतक का विश्व तोकडं व्हावं....आणि हे सगळं आम्हा मुलींच्याच बाबतीत का बरे?????
याचा अर्थ असा नाही की मी त्याच्याबरोबर खुष नाहीये...पण माझी इतर नाती कुठतरी हरवलीयेत....असलेल्या नात्यांची वाढ कुठतरी खुंटलीये....इतकं माझ विश्व फ़क्त त्याच्याच साठी उरलयं.....
खुप खुप प्रेम करते मी त्याच्यावर...पण त्याच्या अशा दुर असल्यामुळे...आमच्या वेळा जुळत नसल्यामुळे मला जेव्हा अचानक व्यक्त व्हायच असतं किंवा कुठं भटकायला जायचा मुड असल्यावर ते जायला न मिळणं याचच फ़ार वाईट वाटतं...आणि आता कुणाशी तितकासा संपर्क नसल्यामुळे उरते फ़क्त मी एकटी.....
खुप कंटाळा येतोय आता मला या विरहामुळे आलेल्या माझ्याच मॅच्युरिटीचा.....अल्ल्ड व्हावसं वाटतयं....पुन्हा मित्र-मैत्रीणींसोबत हुंदडावस वाटतयं.....
माझं त्याच्या सोबतच पण वेगळ असही काही अस्तित्व आहे हे माझंच मला उमगलयं आता...तेच अस्तित्व मला जगावसं वाटतयं....
सखे तुलाही वाटतच असेल ना??????
वाटतयं का गं तुलाही....
कर्तव्यात अडकण्यापुर्वी...
मोकळे काही श्वास घ्यावासे....
पुन्हा फ़ुलपाखरु होऊन ....
अल्लड रंगात रंगावेसे...
वाटतयं ना....???
...सई
8 comments:
Agadi manaatal lihilas tu Saye !
Patal 100%.
Mihi tula hech saangato na, find your own indentity. Swatach life jag. doghancha life asat, bt b4 that tujh lyfe bagh.
Good luck...
very true sups..
exp speaks a lot...
वाह सई, मस्त पोस्ट...
It happens with boys as well. :)
Experienced it..
Baaap re.... He ase kahi hote premat padalyawar????
Bhitich watayala laagliye mala... :)
धन्यवाद मित्रांनो,
आणि मैथिली घाबरायच काय त्यात....प्रेमात घाबरायच नसतच मुळी.....
Very Nice Sai....
I understand... :)
सये.....
त्याची तू सयी..
अशी निरमयी....
त्याच्यात रमली...
भासते निराळी....
त्याच्यात राहून...
आहेस वेगळी...!!
सये... म्हणालीस ते चूक नाहीच... पण हे नेहमीसाठी नाही होत हं...dont worry तोच तूझं आगळेपण जपतोय..जपेल...तूला कळणारही नाही...!! :)
खूप आवडलं लिहिलेलं...!!
Post a Comment