रिमझिम रिमझिम पावसात
चिंब होत भिजताना....
शहारतं मन असं... जसं
तुझ्या आठवात रुजताना....
बरसणार्या सरीमधुन हलकेच
थेंब तळहातावर झेलताना....
ओलावतं मन असं...जसं
तुझ्या मिठीत थिजताना....
रुणझुण बरसणारा पाऊस
पैंजणात अडकताना.....
झंकारतं मन असं...जसं
तुझ्या स्पर्श अनुभवताना...
.....सई(सुप्रिया पाटील)
2 comments:
ह्म्म्म...पाउस सुरु झालेला दिसतोय....तुझ्या शब्दांतूनही दिसतोय तो...
च्यायला, इकडे तर जाम गर्मी आहे..उन्हाळा आहे न म्हणून...
बघू या वर्षी तरी देशातल्या पावसात भिजता येत कि नाही ते.
आवडली कविता ..
Post a Comment