माझ्या मनात रुजलेली,
तुझी हरएक आठवण....
तुझ्या सहवासात सजलेला
जगलेला...प्रत्येक क्षण...
हे सारचं कसं....
नेहमीच पुन्हा नव्यानं जन्मलेलं.....
प्रत्येकवेळी तितकचं नाविण्य...
तितकीच ओढ घेऊन मनात येतं....
अन मग मनाची पाऊलं घेतात धाव ...
तुझ्याच दिशेनं....
अगदी बेभान होऊन....
तु माझाच आहेस हे ठाऊक असुनही....
का? तुझ्याच अस्तित्वाचा शोध घेत रे मन....
प्रत्येक वस्तुत...प्रत्येक अणु-रेणुत....
तुझ्या असण्याचा भास होतो मनाला....
प्रत्येक क्षणाला तुझ्या प्रेमात पडते मी जणु....
पुन्हा नव्याने.....
....सई
2 comments:
काय गं आता त्या लपवलेल्या 'त्या' कविता पण पोस्टव की जरा. आता कळले सगळ्यांना.
हा घे पावसाचा खो
http://tusharnagpur.blogspot.com/2010/08/blog-post_31.html
मला माझे कॉलेजचे दिवस परत दिलेस....धन्यवाद. :)
Post a Comment