Monday, February 27, 2012

"स्वप्न"

जुळतात स्वप्न
केवळ हा भास
बंधनाच्या बेड्या
तोडतात श्वास....

इवलं ते स्वप्न
उरात वसते 
क्षण क्षण मन
स्वप्नच  गुंफते....

चालते एकटी
स्वप्नांची वाट
सरणाहूनही 
बिकट पायवाट....

कण कण असे 
तुटणारे स्वप्न
ठीकऱ्या  होऊन
विखुरले मन....

विखुरत्या मना
आकाशाची ओढ
चांदण ओंजळ
स्वप्नांची जोड....

स्वप्नांना का मन
देते पुन्हा हाक
त्यांनाही आहेच
प्रकाशाचा धाक....

...सई 

2 comments:

Jitendra Indave said...

जुळतात स्वप्न
केवळ हा भास
बंधनाच्या बेड्या
तोडतात श्वास....

इवलं ते स्वप्न
उरात वसते
क्षण क्षण मन
स्वप्नच गुंफते....


फार मस्त लिहिले आहे ..तुम्ही तुमच्या कविताचा संग्रह प्रसिद्द करा कि

सुप्रिया.... said...

@ Jitendra
धन्यवाद .. :)
ब्लॉगवर स्वागत आहे...