उन्हाळ्यात पाऊस,पावसाळ्यात पाऊस,
पावसाने आता अजुनच गारठला हिवाळा...
बँगलोरमधे एकच ऋतू तो म्हणजे पावसाळा...
पावसाने आता अजुनच गारठला हिवाळा...
बँगलोरमधे एकच ऋतू तो म्हणजे पावसाळा...
हे तस्स मला आता कळुन चुकलय ....
आजही खुप सारे भरुन आलेले ढग, रिमझिम पाऊस, बसच्या खिडकीवरुन ओघळणारे थेंब आणि कानात वाजणारी संदिप खरेची गाणी. कुणा प्रियकर-प्रेयसीला "विरहात" असताना हवहवसं वाटेल अगदी तसंच वातावरण.... पण आता मी विरहात नाही....अशा वातावरणाचा मला काय उपयोग??आणि तसही मला ऊन पाऊस आणि थंडी यांच्यापेक्षा ज़रा जास्तच आवडत
...सख्या ला कधी म्हटल मी की, "आज काय मस्त ऊन पडलय" तर त्याच एकच उत्तर..."तुला एखाद्या दिवशी उन्हात दोरीवर वाळत टाकतो,मग खा हव तेवढ ऊन "
ऊन हा प्रकार मला इथे जास्त जाणवलाच नाही. आता आठवतात मी मुंबईत असताना सुर्य उगवल्याबरोबर माझ्या बेडरुमच्या खिडकीतून आत येणारी किरणं. तेव्हा सकाळच्या सुर्याचा राग यायचा कारण अगदी त्याने उगावल्याबरोबराच मलाही प्रकाशावं लागायचं. पण आता तर कुणी ऊन्हं उधार दिली तर बर होइल ....ती मागावीशी वाटतात.... 
"रुणझूणत्या पाखरा, जा रे माझ्या माहेरा,
थोडी ऊन्हं तिथून आणून, त्याचा वर्षाव इथे करा."


..सई
..सई