Monday, October 4, 2010

तुजवाचुन जन्मच अडतो.

प्रिय सख्या,

तुझ्यात इतकं कधी गुंतले हे कळलचं नाही रे! माझ्यासारखी चंचल,अल्लड,चिडचिड करणारी,नको तेवढीpractical,straight forward व्यक्ती कुणावर इतकं प्रेम कशी करु शकते हाच विचार येतो हल्ली मला.

खरंच प्रेमात पडल्यावर माणूस संपुर्ण बदलतो याचा मला नव्यानं साक्षात्कार होतोय,म्हणजे तीन वर्षापुर्वी तुझ्याप्रेमात नुकतेच पडलेली मी आणि आजची मी यात जमिन-अस्मानाचा फ़रक जाणवतोय.

जशी मैत्री दिवसेंदिवस मुरते तस्सच आपलं प्रेम दिवसेंदिवस मुरतयं. प्रत्येक दिवशी प्रेमाची नवी छटाजाणवतेयं,नवा अर्थ कळतोयं.असं म्हणतात(प्रेम कधीच केलेले लोक) की काही दिवसांनी कंटाळा येतो तेच तेचगोड-गोड बोलण्याचा,भांडण्याचा.पण मला वाटत की जितकं जास्त आपण समोरच्या व्यक्तीला जाणतो ओळखतोतितकच त्या व्यक्तीबद्दलच प्रेम ओढ जास्त प्रमाणात वाटते.

आपण दोघं एकमेकांपासुन इतके दूर राहूनही एकमेकांबद्दलची सय अगदी तशीच पुर्वीसारखीच. खरतर पुर्वीपेक्षाहीजास्त वाढलीये.


तुझ्या माझ्या नात्याला,
नाही अंतराची बंधनं,
नाही दुराव्याचे दुःख,
नको स्पर्शाची आस.
नाही झाला संवाद जरी,
तरी आहे विश्वासाची वीण,
जी प्रत्येक क्षणासोबत
अजुनच घट्ट होतेयं....
कुठलीतरी अनामिक "
सय"
जुळलीये आपल्यात
म्हणुनच श्वासागणिक,
येते तुझी आठवण....
अन करते मनात
तुझी तुझीच साठवण....


तु विचार करत असशील आज इतकं सगळं सांगाय्ची गरज का वाटली हिला?आला ना हा प्रश्न मनात??

खरतरं मी इतकी बडबड करते,सगळ्या लहानातल्या लहान गोष्टी तुला सांगते कधी कधी फ़टकळपणे तुला काहीहीबोलते.पण मनापासुन मनातलं असं मनमोकळेपणाने बोलतच नाही.

आजही नेहमीप्रमाणे मी चिडचिड केली आणि तुझ्या "माझ्याशिवाय जगु शकशील का?" या प्रश्नावर अगदीखडुससारखं "हो" अस उत्तर दिलं.

पण खरं सांगु का मनात खड्डाच पडला होता.आताही विचार करुनही कसंसच होतयं.

मी इतके practical पणाचे उपदेश देते की कुणाचं कुणावाचुन काही अडत नाही. सगळंव्यवस्थित चालतं, वगैरे...पण तुझ्याशिवाय मी हा विचार जरी केला तरी इतकं काही भांबावुनजायला होतं की बास.

तु भारतातुन परत अमेरिकेला जाताना २४ तास माझ्याशी बोलला नाहीस तेव्हाही असच झालं होत.खुप काहीतरीचुकतयं असं!


खरचं,

श्वासही अडखळतो

जीव सतत तुटतो

सख्या रे,

तुजवाचुन जन्मच अडतो !तुझीच,

सई

Thursday, September 23, 2010

ती, तो..

ती,
त्याचीच झालेली
"संपुर्ण" !!
तो,
तोही तिच्याविना
"अपुर्ण" !!

ती,
विसरते त्याच्यामधे
"अस्तित्व"!!
तो,
तिच्यातच शोधतो
"स्वत्व"!!

ती,
त्याच्या हरएक क्षणाची
"साथीदार"
तो,
तिच्या प्रत्येक हालचालीचा
"साक्षीदार"

ती,
त्याच्या श्वासात
"भिनलेली"
तो,
तिच्या हरएक श्वासात
"रुजलेला"

...सई

Tuesday, August 3, 2010

पुन्हा नव्याने.....प्रेम....

माझ्या मनात रुजलेली,
तुझी हरएक आठवण....
तुझ्या सहवासात सजलेला
जगलेला...प्रत्येक क्षण...
हे सारचं कसं....
नेहमीच पुन्हा नव्यानं जन्मलेलं.....
प्रत्येकवेळी तितकचं नाविण्य...
तितकीच ओढ घेऊन मनात येतं....
अन मग मनाची पाऊलं घेतात धाव ...
तुझ्याच दिशेनं....
अगदी बेभान होऊन....
तु माझाच आहेस हे ठाऊक असुनही....
का? तुझ्याच अस्तित्वाचा शोध घेत रे मन....
प्रत्येक वस्तुत...प्रत्येक अणु-रेणुत....
तुझ्या असण्याचा भास होतो मनाला....
प्रत्येक क्षणाला तुझ्या प्रेमात पडते मी जणु....
पुन्हा नव्याने.....

....सई

Wednesday, June 9, 2010

रिमझिम पावसात

रिमझिम रिमझिम पावसात
चिंब होत भिजताना....
शहारतं मन असं... जसं
तुझ्या आठवात रुजताना....

बरसणार्‍या सरीमधुन हलकेच
थेंब तळहातावर झेलताना....
ओलावतं मन असं...जसं
तुझ्या मिठीत थिजताना....

रुणझुण बरसणारा पाऊस
पैंजणात अडकताना.....
झंकारतं मन असं...जसं
तुझ्या स्पर्श अनुभवताना...

.....सई(सुप्रिया पाटील)

Tuesday, February 9, 2010

प्रिय सखीस,

सखे,
फ़ार पुर्वी कुठतरी वाचलं होत,की प्रेमात पडल्यावर मुलाच जग काहीच बदलत नाही,पण मुलीच सगळं जग त्या एका व्यक्तीबोवतीच गुरफ़टुन राहतं.....आज प्रकर्षानं हे खरच आहे अस जाणवलं......खरच किती बदलतो आपण प्रेमात पडल्यावर,आपला जोडीदार कितीही समजून घेणारा असला किंवा किती स्पेस देणारा असला तरीही....तरीही....बदल हे होतातच......
आज एक मुलगी म्हणुन हे सगळं जाणवतयं....मला त्याच्याशिवाय अस काही विश्वच उरलेलं नाही.....सगळ जग त्याच्याच अवतीभवती सामावलेलं आहे.....प्रत्येक छोटी-छोटी गोष्ट करताना....काही करण्याच्या विचारही करताना पहीला विचार त्याचा येतो...त्याला काय वाटेल...नाहीतर तो काय म्हणेल.
तो मला खुप समजुन घेतो....मी त्याच्याशी सगळं शेअरही करते...पण कधी काही गोष्टी एखाद्या जवळच्या मित्राला वा मैत्रीणीला सांगाव्याशा वाटल्या तर मला तस कुणी उरलच नाहीये हे कळुन चुकतं....
प्रेमात पडल्यामूळे इतर नात्यांवर परिणाम का व्हावा हेच कळत नाही....पुर्वीसारखं मित्र-मैत्रीणींशी भेटणं होत नाही...त्यांच्याशी फ़ोनवर बोलणही होत नाही...इतक का विश्व तोकडं व्हावं....आणि हे सगळं आम्हा मुलींच्याच बाबतीत का बरे?????
याचा अर्थ असा नाही की मी त्याच्याबरोबर खुष नाहीये...पण माझी इतर नाती कुठतरी हरवलीयेत....असलेल्या नात्यांची वाढ कुठतरी खुंटलीये....इतकं माझ विश्व फ़क्त त्याच्याच साठी उरलयं.....
खुप खुप प्रेम करते मी त्याच्यावर...पण त्याच्या अशा दुर असल्यामुळे...आमच्या वेळा जुळत नसल्यामुळे मला जेव्हा अचानक व्यक्त व्हायच असतं किंवा कुठं भटकायला जायचा मुड असल्यावर ते जायला न मिळणं याचच फ़ार वाईट वाटतं...आणि आता कुणाशी तितकासा संपर्क नसल्यामुळे उरते फ़क्त मी एकटी.....
खुप कंटाळा येतोय आता मला या विरहामुळे आलेल्या माझ्याच मॅच्युरिटीचा.....अल्ल्ड व्हावसं वाटतयं....पुन्हा मित्र-मैत्रीणींसोबत हुंदडावस वाटतयं.....
माझं त्याच्या सोबतच पण वेगळ असही काही अस्तित्व आहे हे माझंच मला उमगलयं आता...तेच अस्तित्व मला जगावसं वाटतयं....
सखे तुलाही वाटतच असेल ना??????

वाटतयं का गं तुलाही....
कर्तव्यात अडकण्यापुर्वी...
मोकळे काही श्वास घ्यावासे....
पुन्हा फ़ुलपाखरु होऊन ....
अल्लड रंगात रंगावेसे...
वाटतयं ना....???


...सई