Wednesday, January 4, 2012

"नात्यांची वीण"

नात्यांची वीण.....?
जुन्याच  नात्यांना पुन्हा नव्याने उलगडताना,
कित्येक प्रश्नांना नव्याने समोर जात मन...
उरात दाटते  एक अनामिक  हुरहूर,
मनात नुसते प्रश्नांचे काहूर...
काही प्रश्न खूप जवळचे....ज्यांचे सुटले होते कोडे
काही प्रश्न नकोसे... अजूनही जे अनुत्तरीत
कुठला प्रवास असावा खरा....
नात्यांची वीण एकसंध असलेला की,
तुटून गाठ बसलेली नाती उलगडण्याचा ?
गाठ सुटली की सगळच मोकळं...पोकळी निर्माण झालेलं...
म्हणूनच कदाचित जपतो आपण त्या गाठी...
निरगाठी होईपर्यंत....
निरागाठींच असं सुरेख गुंतण....
त्यासोबत सुख-दुःखाचे आंदण...
आयुष्याच्या वस्त्राची अशीच असावी जरतारी गुंफण...

.....सई

8 comments:

BinaryBandya™ said...

म्हणूनच कदाचित जपतो आपण त्या गाठी...
निरगाठी होईपर्यंत....

sahich

सुप्रिया.... said...

Thanx BB :)

फुलपाखरू said...

hmm...khare bolalis...kadhi kadhi gaathi na ulgadane hech changle tharte :)

सुप्रिया.... said...

@ फुलपाखरू : Hmm...Ulagadayla gel ki ajunach GUNTA hoto :)

केदार said...

तुम्ही जे काही लिहिलं आहे ते समजावून घेण्याचा प्रयत्न करतोय. ही कविता आहे की स्फुट, हे स्पष्ट नाही. हरकत नाही, नाव नसेलेले लेखनही असावे कधीतरी.
नात्यांची वीण ही फार मोठी विचित्र गोष्ट आहे. मुद्दाम कोणी गाठ बांधत नाही. ललाटलेखात ज्यांची नावे असतात त्यांची गाठ पडते आणि नात्यांची गाठ घातली जाते. अनेक गाठींची उकल होत नाही.
आपण इतर काय लिहिता ?

केदार said...

समजावून घेण्याचा प्रयत्न करतोय अशा अर्थाने की, लिहिताना आपली मनस्थिती नेमकी कशी होती, विशिष्ट अनुभवावर आधारीत लेखन आहे की काय..

सुप्रिया.... said...

@ केदार,अभिप्रायाबद्दल धन्यवाद... मी फॉर्म मधे मुळात लिहीत नाही...मला जस सुचेल तस मी लिहीते :)

तुम्हाला जे काही समजून वाचवस वाटत तस वाचा :)....माझ इतर लेखन ह्याच ब्लॉगवर आहे :)

नाती हाच एक खूप गहन विषय आहे लिहायला अन् जगायलाही :P :D

प्रत्येक लेखन हे वैयक्तिक अनुभवातूनच येत अस मुळीच नाही...काही लेखन हे दुसर्‍या कुणाच्या अनुभवातून अन् आपल्या जाणिवेतूनही येऊ शकत नाही का?

केदार said...

तुमची प्रतिप्रतिक्रिया आवडली.

नाती हाच एक खूप गहन विषय आहे लिहायला अन् जगायलाही :P :D - सुंदर.

आपने सही बात कही है! ये जरुरी नही के सबकुछ खुदके साथ होना चाहिये, कुछ बातें समझनेकी भी होती है!