Tuesday, August 26, 2008

...सत्य...

सत्य समोर आलं की
घाबरतात सारे सामोर जायला...
देतात संस्कृतीचे दाखले उगा
"आपल्यात नाही हं असलं काही घडत.."
अस म्हणून दुर्लक्ष करतात सत्याकडे
पूर्वी हाय सोसायटीत घडायचं.. घडतयं ते आता सगळीकडे
wife swapping काय नि डिस्कोथेकमधे
रात्र घालवारी तरुणाई काय..
only fun is imporatant...
पैसे जास्त मिळतात ना त्याच करणार तरी काय???
म्हणुनच हातात त्यांच्या मद्याचे पेले येतात.
तुमची so called संस्कृती ज्यात ते रिचवतात.
आपण मात्र अगदी ढीम्म होऊन बघत राहतो.
आणलं कुणी समोर हे तर,
त्यालाच संस्कृती शिकवतो.
संस्कार सारे नामशेष होतायत आता...
कमी पडतो पॉकेट मनी म्हणून मुली
कॉल गर्ल म्हणून स्वतःला विकतायत आता...
आपण मात्र फ़क्त बघ्यांची काम करतोयं..
आणि पडणार्‍या संस्कृतीच्या भिंती
सावरण्याचा प्रयत्न करतोयं...
खरचं प्रयत्न करतोयं का??????

....सई(सुप्रिया पाटील)

1 comment:

Raje said...

मला वाटत सस्कारान्चि वीण घट्ट करणे हाच यावर उपाय आहे. उथळ विचार उथळ वागणुकिला उत्तेजन देतात.

यात आई म्हणून स्त्रिची भूमिका महत्त्वाची आहे. आणि याची जाणिव तुझ्याप्रमाणे प्रत्येक स्त्रिला होणे गरजेचे आहे